उत्सव
एकविरा देवी संस्थान हिवरा (सं) तर्फे नवराञोत्सव काळात शारदीय नवराञोत्सव अश्विन शु.1 ते दसरा अश्विन शु 10 साजरा केला जातो.ह्या वर्षी दि 25/09/2014 ते 03/10/2014 पर्यंत आयोजीत केला आहे.या काळात घटस्थापणा अश्विन शु.1 रोजी केली जाते.तसेच दररोज सकाळच्या वेळी आरती केली जाते.आरतीसाठी आजुबाजूच्या परिसरातून हजारो भाविक भक्त व महिला मंडळी येतात.
कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सी.सी.टि.व्ही.कॅमेरे येथे बसविण्यात आले आहे.
उत्सव काळात व्यापारी आपापली दुकाने घेऊन दहा दिवस राहतात.यात प्रामुख्याने
बेल,फुल,प्रसाद मिठाई,खेळणी,भांडी,बांगडी,आदी प्रकारचे 25 ते 30 दुकाने आसतात.तसेच दररोज येणारया भाविकांसाठी दात्यांतर्फे उपवासाचे अल्पोपहार आयोजन केले जाते.व शेवटच्या दिवशी गावकरयांतर्फे आणि देणगी दारांच्या सहकर्याने महाप्रसाद केला जातो. उत्सव काळात गर्दी होऊ नये म्हणून शिस्तबध्द नियोजन केले जाते.उत्सव काळात साधारणपणे दररोज 5000 पाच हजार भाविक भक्त मातेच्या दर्शनासाठी येत असतात.
विशेष म्हणजे परप्रांतातून सुद्धा भाविक येतात या मध्ये आंध्रप्रदेश, छत्तीसगड,
मध्यप्रदेश ,गुजरात इत्यादी राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात.
उत्सव काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी महसूल विभाग, पोलीस प्रशासन,
जि.प.आरोग्य विभाग,म.रा.वि.वि.कं.यांचे सहकार्य लाभते.