संस्थेविषयी
जुन्या विश्र्वस्तांनी या ठिकाणी 12 वर्षे याञा भरवली होती.याञे मध्ये भजन,किर्तन,प्रवचन,गुरांचे रोगनिदाण शिबीर,शंकरपट हे खेळ आयोजीत करण्यात आले तसेच गावकरयांच्या सहकार्याने व युवक वर्गाच्या मदतीने याञी निवास, कार्यालय, सभामंडप आदी वास्तु उभारण्यात आल्या.ह्या नंतर 2003 मध्ये नविन नोंदणीकृत विश्र्वस्त मंडाळाची नेमणूक करण्यात आली.
नविन विश्र्वस्त मंडळाने गावकरयांच्या सहकार्यातून अंदाजे 40 लक्ष रू.खर्चून मंगल कार्यालय उभारले.आलेल्या निधीतून अंदाजे 10 लक्ष रू चे मातेच्या अंगावर दागिणे तयार केले.व आता पावेतो 15 लक्ष रू खर्च करूण मंदीर पुनर्निर्माण करण्याचे काम हाती घेण्यात आले.हे बांधकाम करण्यासाठी आणखी 70 लक्ष रू.ची आवश्कता आहे.
जिल्हा परिषद तर्फे गावातून मंदीराकडे जाण्यासाठी 1 कि.मी.चा रस्ता व पुसद माहूर रोडपासून मंदीरापर्यत जाण्यासाठी 1 कि.मी.चा रस्ता तयार करण्यात आला.
जि.प.सदस्य म.धों.कदम यांच्या निधीतून 15 लक्ष रू.भक्त निवास व 10 लक्ष रू.
संरक्षक भिंत चे बांधकाम करण्यात आले. भक्तांना राहण्यासाठी निवासाची सोय झाली सोबतच स्वच्छतागृह व शौचालय चे बांधकाम केलेले आहे.संस्थान तर्फे वृक्षारोपण करण्यात आले आहे.